डांभूर्णीतील दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

0

यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथील इयत्ता दहावीत असलेल्या कैलास चंद्रकांत सपकाळे (16) या विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून हा विद्यार्थी बेपत्ता असतानाच शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळला असून या विद्यार्थ्याच्या डोक्यावर कुठल्यातरी जड वस्तूचा मारा करण्यात आला असून डोळ्यात काड्यादेखील खुपसण्यात आल्याचे सांगण्यात आले.
डांभूर्णी गावातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या डांभूर्णी शिवारातील शेतात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली.

यावल पोलिसात खुनाचा गुन्हा
मयत कैलास हा गुरुवारपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी ही उघडकीस आली. कैलासच्या डोक्यात वीटांचा मारा झाल्याचा संशय असून डोळ्यातदेखील काड्या खुपसण्यात आल्या. घटनास्थळी यावल पोलिस निरीक्षक अरूण धनवडे व सहकार्‍यांनी धाव मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी व डॉ.पी.एल.पवार हे मृतदेहाचे शवविच्छेदन करीत असल्याचे सांगण्यात आले.

Copy