डंपर-अ‍ॅपे रीक्षा अपघात ; डंपर चालकासह दोघांना अटक

यावल : चोपडा रस्त्यावर वाळू वाहतूक करणारा डंपर व अ‍ॅपे रीक्षात अपघात झाल्याची घटना 7 जून रोजी घडली होती. या अपघातात रीक्षा चालकासह अन्य एक जण जखमी झाला होता. या अपघात प्रकरणी डंपर मालक व चालक या दोघांना गुरूवारी यावल पोलिसांनी अटक केली. 7 जुनच्या मध्यरात्रीनंतर चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोलपंपाजवळ वाळू वाहतूक करणारे डंपर (एम.एच.19 सी.वाय. 3426) व अ‍ॅपे रीक्षा (एम.एच. 19 ए.ई. 6493) यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात रीक्षा चालक प्रमोद नारायण तायडे (रा.केर्‍हाळा, ता.रावेर) व तुषार वाघुळदे (रा. जळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला होता. अपघात प्रकरणी यावल पोलिसात पोलिस कर्मचारी राजेश सुभाष महाजन यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुरूवारी डंपर मालक महेंद्र पांडूरंग पाटील (रा.पिंप्राळा जळगाव) व चालक मुस्ताक दाऊद पिंजारी (रा.जळगाव) या दोघांना अटक केली. या अपघातातील अ‍ॅपे रीक्षा चालकाची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास सहा.फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

Copy