ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

0

जळगाव : जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवी परत करण्यासाठी एक वर्ष कालावधीचा कालबद्ध कार्यक्रम सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या पतसंस्थांमध्ये मोठ्याप्रमाणावर ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असून त्यासंदर्भातील आढावा सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, विभागीय निबंधक भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील पाच तालुक्यात ठेवीदारांचे प्रमाण जास्त
अडचणीतील पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कृती कार्यक्रम ठरविण्यात आला. जिल्ह्यातील पाच प्रमुख तालुक्यांत ठेवीदारांच्या ठेवींचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी कर्जदारांकडून कर्ज वसुली करण्यासाठी कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यानुसार ज्या कर्जदारांची कर्ज 10 हजार रुपयांच्या आत आहे. जिल्ह्यात 91 हजार कर्जदार होते. त्यापैकी 44 हजार जणांकडून वसुली झाली आहे. तर 119 पतसंस्थामधील 47 हजार जणांकडून वसुली बाकी आहे. या सर्व जणांकडून 100 टक्के वसुलीसाठी कलम 101 अन्वये नोटीसा बजावून कारवाईला सुरुवात करण्यात येईल. जिल्ह्यात येत्या 31 मार्च 2017 पर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात जंगम मालमत्ता जप्त करणे, त्यानंतर मालमत्तेचा लिलाव करुन वसुली केली जाईल. तीन वेळा लिलाव होऊनही विक्री न झाल्यास सदर मालमत्तेवर संस्थेचे नाव लावण्यात येईल. अशा टप्प्याने वसुली करुन ती रक्कम ठेवीदारांना परत करण्यात येईल. यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. वसुली करुन ठेवी परत करण्याचा हा पॅटर्न जळगाव जिल्ह्यात प्रथम राबविण्यात येत आहे. हा यशस्वी ठरल्यास हाच पॅटर्न राज्यभर लागू करु, असेही ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

ठेवीदारांनी अडवली सहकार राज्यमंत्र्याची गाडी
जनसंग्रामच्या ठेवीदारांचे उपोषण गेल्या आठ दिवसापासुन जिल्हाधिकारी कार्यालयसमोर अमरण उपोषण सुरू आहे. त्यापार्श्‍वभुमीवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठेवीदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी जनसंग्रामच्या संतप्त ठेवीदारांनी मंत्र्यांच्या गाडीला घेरा घालत अडवणुक कराण्यचा प्रयत्न केला. यावेळी ठेवीदारांना आश्‍वासन देऊन तृतास दिलासा दिला आहे. ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून बैठकीत ठेवीदारांना निर्णय न मिळाल्यामुळे बाहेर येऊन संतंप्त ठेवीदारांनी घोषणा बाजी करत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी तृर्तास दिलास मिळावा म्हणुन ठेवीदारांच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.