ठाणेपाडा जंगलात मांडूळची तस्करी: मोटारसायकलसह एकाला अटक

0

नंदुरबार– नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा परिसरात मांडूळची तस्करी करतांना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन मोटारसायकल, डिजीटल काटा व सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा जिवंत मांडूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ मांडूळची तस्करी होत असल्याची खबर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून सापळा रचला. यावेळी मांडूळाची तस्करी करीत असतांना व वग्रलाल गवळी चव्हाण (रा.जामदे ता.साक्री) यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडून तीन मोटारसायकल व वजन मोजण्याचा एक डिजीटल काटा असा सुमारे दोन ते तीन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली असून मांडूळला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ही कारवाई नंदुरबारचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, नवापूरचे प्रथमेश हाडपे, चिंचपाड्याचे आर.बी.पवार, प्रशांत हुमने, एस.एम.पाटील, पी.डी.पवार, अभिजित पाटील, अरविंद निकम, भुपेश तांबोळी, कल्पेश अहिरे, भानुदास वाघ, एस.पी.पदमोर, लक्ष्मण पवार, दीपक पाटील, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, ममता पाटील, नयना हडस, माजी सैनिक विशाल शिरसाठ या पथकाने केली आहे. पकडण्यात आलेला मुद्देमाल नंदुरबार आगारात जप्त करण्यात आला असून संशयिताविरूध्द वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक व विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे.

Copy