ठाकरे सरकारमधील आणखी एका बड्या मंत्र्याला कोरोना

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांपासून राजकीय नेते मंडळी सर्वच कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. ठाकरे सरकारदेखील कोरोनाचा विळख्यात सापडले आहे. सरकारमधील डझनभर मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातच आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे परीक्षा घेऊ नये अशी भूमिका असलेले राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली. ‘माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार’, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.

“गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे’ असे ट्वीट मंत्री सामंत यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नटे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून सध्या यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Copy