ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्राला कोरोनाची लागण

0

मुंबई: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात दररोज २२ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सामान्य नागरिकांपासून तर राजकीय नेते मंडळी, सेलिब्रेटी सगळेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ठाकरे सरकारही कोरोनाचा कचाट्यात सापडले आहे. ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना कमी लक्षणे असल्याने त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. त्यांच्या पत्नींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता त्यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.

यापूर्वीही ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.