ठाकरे सरकारच्या नावे चिठ्ठी लिहून जळगावात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

0

जळगाव: गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नसल्याने कर्मचारी प्रचंड तणावात आहे. आज सोमवारी राज्यभर एसटी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. दरम्यान जळगावात एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मनोज चौधरी असे आत्महत्या केलेले कर्मचाऱ्याचे नाव आहे. ठाकरे सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने आता सरकार विरोधात विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहे.