ठाकरे बंधू भेटले! सभेची उत्सुकता

0

मुंबई । लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनातली अपेक्षीत भेट अखेर झाली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे हे उध्दव ठाकरेंना भेटले आहेत. ही भेट एका नातेवाईकाच्या आजारपणाच्या निमित्ताने का होईना पण नुकतीच झाली हे सत्य आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र अद्यापि गुलदस्त्यात आहे. आजच्या स्टार प्रचाराच्या मुहूर्ताला राज ठाकरेंची तोफ कोणावर धडधडणार त्यातून या भेटीचा तपशिल उघड होणार आहे.

शिवसेना भाजप युतीचा कोडीमोड झाल्याझाल्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर पोहचले होते. राज ठाकरेंनी मैत्रीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचा निरोप त्यांनी दिला होता. मात्र तेव्हा उध्दव ठआकरेंनी स्पष्ट नकार दिला होता. परंतू त्यानंतरही राज ठाकरे प्रत्यक्ष प्रचारात उतरले नाहीत. त्यासाठी आजारपणाचे नाजूक कारण बोलून दाखवले जात आहे. मात्र याच संवेदनशिल क्षणी दोघांची भेट झाली आणि त्यावेळीच दोघांमध्ये काही समेट घडला का? असा मागोवा आता घेतला जात आहे. राज ठाकरे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरत आहेत. काही निवडक सभा ते मुंबई, पुणे आणि नाशिक येथे घेणार आहेत. यात यांची आज पहिली सभा होणार आहे. यात ते नेमक्या कोणत्या मुद्यांना हात घालणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.