‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’चे मोशन पोस्टर रिलीज

0

मुंबई: बॉलीवूडचा शेहेनशा, परफेक्शनिस्ट, बार्बी डॉल आणि दंगल गर्ल म्हणजेचं अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ‘लोगो’ रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटातील ठगांचे कमांडर ‘खुदाबक्ष’ हे पात्र साकारणाऱ्या बिग बींचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

चाहत्यांमध्ये ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दिसत आहे. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा स्क्रिनवर एकत्र पाहायला मिळणार म्हटल्यावर चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमिताभ बच्चन यांचे ‘खुदाबक्ष’च्या रूपातील हे मोशन पोस्टर तुमची उत्सुकता आणखी वाढवणार आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी हे मोशन पोस्टर त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.

Copy