ट्वीटरवर विनोद कांबळीचा चुकीचा ट्रोल!

0

मुंबई । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांच्या मृत्यूचे वृत्त आल्यानंतर लगेचच ट्वीटरवर विनोद खन्ना हा ट्रेंड झाला होता. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना एका खोडकर ट्वीटर युझरने जाणूनबुजून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला टॅग केले.

त्यानंतर ट्वीटराइट्सनी कांबळीला ट्रोल करायला सुरूवात केली. आपल्याला जाणूनबुजून ट्रोल करण्यात आल्याचे समजल्यानंतर विनोद कांबळी चांगलाच संतापला. विनोद खन्नांसोबत आपल्याला मुद्दाम टॅग करणार्‍या युझरला रिप्लाय देताना त्याने आपल्या संतापाला वाट करून दिली. तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. विनोद खन्नांसारख्या अष्टपैलू अभिनेत्यासाठी थोडातरी आदर दाखवा, असे ट्वीट करताच कांबळीला ट्रोलिंग करणे थांबविले.