ट्रॉलाची मोटारसायकला धडक; एक ठार

0

चाळीसगाव – धावत्या ट्रॅलाची धडक मोटारसायकलला लागल्याने मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २० रोजी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव रोडवर पातोंडा ते ओझर गावाच्या दरम्यान रोडवर घडली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ट्रॉला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी तालुक्यातील वाघळी येथील दत्तु कौतीक लोखंडे (५२) हे व्यापाऱ्यांकडे केळीचे घड कापण्याचे काम करतात त्यासाठी ते रोज त्यांच्या बजाज पल्सर क्र (एमएच १९ बीएक्स ७२६९) मोटारसायकल वर चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असतात दिनांक २० रोजी त्यांचे कामकाज आटोपुन त्यांच्या मोटारसायकलवर वाघळी गावाकडे परतत असताना सायंकाळी ८-३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव भडगाव रोडवर पातोंडा ते ओझर गावादरम्यान समोरून रॉंग साईडने येणाऱ्या ट्रॉला ने त्यांच्या मोटारसायकलने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे अपघात होताच ट्रॉलाचालक तेथुन अपघाताची खबर न देता पळुन गेला याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संदीप दत्तु लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन ट्रॉला वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.

Copy