ट्रॅक्टर जोरात का चालवतो म्हणून विचारणा केल्याने चारचाकीचा काच फोडला : चौघांविरुद्ध गुन्हा

यावल : तालुक्यातील कोळन्हावी येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जोरात का नेतो? असे विचारल्याचा राग आल्यानेजळगाव येथील एकाने गावातील तीघांच्या मदतीने चारचाकी वाहनाचे काच फोला तसेच मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोळन्हावी, ता.यावल येथील विकास ऊर्फ गोटू जग्गनाथ सोळंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी गावातील मारोती मंदिराजवळ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असतांना त्यावरील चालक रीतीक अनिल सोळंखे (रा.कोळन्हावी) यास इतक्या जोरात ट्रॅक्टर कशाला नेतो? असे सांगितल्याचा ट्रॅक्टर मालक धडकन ऊर्फ आकाश सुरेश सपकाळे (रा.रथचौक जळगाव) यांना राग आला व त्यांनी रात्री मोबाईलवर शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच गावात येवून गावातील इतर तीन जणांना सोबत घेवुन फिर्यादीच्या शेतात असलेले चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.19 ए. एक्स. 2733) च्या काचा फोडून पाच हजार रूपयांचे नुकसान केले. ही घटना फिर्यादीचे काका विष्णू विश्वनाथ सोळंखे यांनी पाहिल्याने चौघांनी तेथुन पळ काढला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहेत.