ट्रकवरून झोल जाताच तरुणाचा मृत्यू : मयत धरणगावातील रहिवासी

A young man died in Dharangaon when he lost his balance while covering the truck with tarpadri धुळे : ट्रकवरून तोल जावून पडल्याने धरणगावातील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू ओढवला. शनिवार, 1 रोजी ही घटना घडली. रोहित दीपक अहिरे (23, रा.धरणगाव, जि.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

तोल जाताच पडला तरुण
धरणगाव येथून निघालेला ट्रक धुळेमार्गे सोनगीरकडून निजामपूरकडे जात असताना ट्रक चालक सुल्तान अहमद शेख ऊर्फ मुसा हे आणि रोहित अहिरे जात असताना शनिवारी ट्रक चाळीसगाव चौफुलीवर आल्यानंतर ट्रकची ताडपत्री निघाल्याने ती लावण्यासाठी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला. ट्रकची ताडपत्री लावण्यासाठी रोहित हा ट्रकवर चढला परंतु ताडपत्री लावत असताना तो थुंकण्यासाठी वाकताच त्याचा झोल गेल्याने तो ट्रकवरून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले. आझादनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली.