ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील लाडू विक्रेत्याचा मृत्यू

0

रावेर : राजगीराचे व तिळाचे लाडू तयार करून गावोगावी जाऊन विक्री करणार्‍या मोह्मद्पुरा (बर्‍हाणपूर) येथील व्यावसायीयकाचा तालुक्यातील चोरवड गावाजवळ ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. प्रल्हाद रुपचंद तायडे (55) असे मयताचे नाव आहे. तायडे हे राजगीराचे व तिळाचे लाडू तयार करून खानापूरसह आजूबाजूच्या खेडेगावात सायकलवर जाऊन विक्री करीत असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घरातून सहा वाजता ते चोरवडकडून खानापूरकडे सायकलने जात असतना पाठीमागून येणार्‍या ट्रक क्रमांक (पी.बी. 23 जी.3297) ने त्यांच्या सायकलीला जोरदार धडक दिल्याने ते खाली फेकले जाऊन ट्रकखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतांना स्थानिक नागरीक ट्रक अडवीत असल्याचे लक्षात येताच ट्रकचालक पसार आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा दीपक तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

Copy