ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू: कुकरमुंडा फाट्याजवळील घटना

0

तळोदा:भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेने 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना कुकरमुंडा फाट्याजवळ घडली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, गुरुवारी 28 मे रोजी रणजीत मोतु पाडवी व त्याची पत्नी रत्ना रणजित पाडवी हे मोटार सायकलीने जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणारा अज्ञात ट्रकने धडक दिल्याने यात रणजीत पाडवी (वय 45) हा जागीच ठार तर पत्नीस दुखापत झाली असून मोटार सायकलीचे नुकसान झाले. याबाबत रत्ना पाडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालका विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास किसन वळवी हे करीत आहे.

Copy