Private Advt

ट्रकची बैलगाडीला धडक : पहुरच्या वयोवृद्धाचा मृत्यू

पहूर : हिवरी फाट्याजवळ भरधाव ट्रकने बैलगाडीला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात नातूनंतर आता  आजोबांचा मृत्यू झाला.

अपघातात दोघांचा ओढवला मृत्यू

पहुरपेठ येथील नजीर शेख मुसा (65) हे नातू नईम शेख नासीर (18) व रहिम शेख नासीर (12) हे तिघे शनिवारी सकाळी वाकोदच्या बाजारात बैलजोडी विक्रीसाठी गेले होते. परंतु बैलजोडी विक्री न झाल्याने दुपारी ते घरी परत येत असतानाच हिवरी फाट्याजवळ मागून येणारा ट्रक (टी. एन. 72 बी. ए. 0453) ने बैलगाडीला जोरदार धडक दिल्यानंतर नईम शेख नासीरचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा नजीर हे गंभीर जखमी झाले. या अपघातात एका बैलाचाही जागीच मृत्यू झाला. नजीर शेख मुसा यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांचाही मृत्यू ओढवला.