भडगाव : तालुक्यातील मौजे टोणगाव शिवारातील पाटचारी क्रमांक 24 पासुनच्या खाली शेतकर्यांना पाटाचे पाणी दिले जात नाही. त्यामुळे शिवारातील शेतातील पिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पाटचारी क्रं.24 मायनर पासुन खाली पाणी बंद केले असुन या शिवारातील सर्व शेतकरी मागिल बाकी भरून व यावर्षासाठी फार्म भरुन संपुर्ण फि भरण्यास तयार आहोत असे निवेदनात म्हटले आहे. सुरेश पवार, रमेश भोई, वना वडे, विजय पाटील, सुनिल पगारे, शेख अकबर, भास्कर महाजन, काशिनाथ महाजन, भिकनुर पठाण, सखाराम महाजन, सुकलाल पाटील आदी शेतकर्यांचे निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
फक्त काही शेतकर्यांना मिळते पाणी
पाटचारी क्रं. 24 मायनरपासुन खाली पाटाचे पाणी सोडले जात नाही. या परीसरातील किमान 60 एकर शेतातील पिकांना पाणी मिळणार नसुन याला पाटकरीचा आळमुठेपणा कारणीभुत असल्याचा आरोप शेतकर्यांचा असुन कर्मचारीला जास्त त्रास नको म्हणून शेतकर्यांना परस्पर सांगितले जाते. तुम्ही फार्म भरले तरी तुम्हाला पाणी मिळणार नाही. शेतकर्यांना पाटकरीकडून आरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे देखील समजते. काही शेतकर्याकडे विहीर आहे. म्हणून त्यांच्या कडुन पाटाच्या पाण्यासाठी फार्म भरायचे नाही. मात्र त्यांना पाटाचे पाणी द्यायचं तसेच काही कोरडवाहु शेतकर्यांना देखील फार्म न भरता पाणी द्यायचे, त्यांच्याकडुन आर्थिक किंवा शेतातील आलेले धान्य प्रत्येकाकडून जमा करुन ते बाजारपेठमध्ये विकायचे असा यांचा नित्यनियम असायचा असे काही शेतकर्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. मध्यंतरी काही वर्ष गिरणा धरण भरले नसल्यामुळे पाटबंधारे कर्मचार्यांकडुन शेतकर्यांना वेठीस धरले जात नव्हते. परंतु यावर्षी धरण भरल्यामुळे पुन्हा शेतकर्यांपेक्षा सिंचन विभागाचे पाटकरींचे सुगिचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. मात्र सुगिचे दिवस कोणाचे आले ? पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भुमिका घेतात याकडे शेतकर्यांचे लक्ष लागुन आहे.