टेंबेतील तरुणाची तापी नदीपात्रात आत्महत्या : शिरपूर तालुक्यातील घटना

Young man jumps into river while riding bike on Tapi bridge: Dead young man, a resident of Tembe शिरपूर :तालुक्यातील गिधाडे लगत तापी नदी पुलावर दुचाकी उभी करून तरुणाने नदी पात्रात उडी घेतल्याची खळबळजनक घटना सोमवार, 21 नोव्हेंबर सायंकाळी घडली. सुरेंद्र सरदारसिंग राजपूत (24, रा. टेंबे, ता.शिरपूर, धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे असून मंगळवारी पोहणार्‍यांना तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तरुणाने आत्महत्या का केली याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

पुलावर दुचाकी लावताच नदीपात्रात घेतली उडी
सूत्रांच्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील टेंभे बु.॥ येथील सुरेंद्र सरदारसिंग राजपूत (24) हा तरुण कृषी क्षेत्राशी निगडभत एक कंपनीत कार्यरत होता. सोमवारी सायंकाळी तरुणाने दुचाकी (एम.एच.18 बी.के.8251) ने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला व दुचाकी उभी करताच तरुणाने तापी नदीत पात्रात उडी घेतली. पुलावरुन वाहतूक करणार्‍या एका प्रवासीने त्याला उडी घेतांना बघितल्यानंतर आरडाओरड केल्याने घटनास्थळावर नागरीकांनी धाव घेतली. तरुणाची ओळख पटविण्यासाठी प्रवाशांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले तर तरुणाच्या दुचाकी क्रमांकावरून त्याची ओळख पटताच टेंभे येथे माहिती कळवण्यात आली.

मंगळवारी मृतदेहाच लागला हाती
टेंभे येथील नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात तरुणाचा मृतदेह हाती न लागल्याने मंगळवारी सकाळी पुन्हा तरुणाचा शोध सुरू करण्यात आल्यानंतर आठ वाजता मृतदेह हाती लागला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.