टीव्हीएस मोटरतर्फे पंतप्रधान रिलीफ फंडासाठी २५ कोटी रुपयांची मदत

0

मुंबई – टीव्हीएस मोटर कंपनीने कोविड- १९ साथीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडासाठी (पीएम- केयर्स) २५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सोमवारी जाहीर केले. कंपनीने टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लि.,सुंदरम क्लेटन लि आणि अशा इतर कंपन्यांच्या वतीने हे योगदान दिले आहे. समूहाचा सीएसआर विभाग असलेल्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टतर्फे (एसएसटी) सध्या विविध उपक्रम केले जात असून त्याव्यतिरिक्त हा निधी देण्यात आला आहे. ‘कोविड -१९ साथीचा हा काळ आधुनिक इतिहासातील सर्वात अनपेक्षित काळ मानला जात असून त्यावर मात करण्यासाठी मानवजातीला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागणार आहे. या संघर्षात सरकार करत असलेल्या दमदार प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. आज राष्ट्र म्हणून सर्वांनी अभूतपूर्व एकी दाखवण्याची अतिशय गरज आहे,’ असे टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन म्हणाले. एसएसटीद्वारे मास्कसारख्या पूरक उपकरणांचे उत्पादन व पुरवठा, आरोग्यसेवा क्षेत्र आणि पोलिस अधिकाऱ्यांसाठी जेवणाचा पुरवठा असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

Copy