टीम इंडियाची विजयी घोडदौड रोखणार -लेहमन

0

पुणे : भारतीय संघाच्या विजयाची घोडदौड रोखण्याची क्षमता आमच्या संघात आहे. आम्ही येथे विजय मिळवण्यासाठीच आलो आहोत व शेवटपर्यंत आम्ही त्याच ध्येयाने खेळणार आहोत, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी सांगितले. लेहमन म्हणाले, ‘‘आमच्या संघातील काही खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यामुळे येथील वातावरण व खेळपट्टी याचा त्यांना सराव आहे. रविचंद्रन अश्विन याच्यासह सर्वच गोलंदाजांनाही त्यांनी तोंड दिले आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत आमचे फलंदाज भारतीय फिरकीबाबत कोणतेही दडपण घेणार नाहीत याची मला खात्री आहे. ते पुढे म्हणाले की, ख्वाजानेही अन्य देशांविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, मात्र आशियाई वातावरणात त्यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे, हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे.