टीम इंडियाचा गजनी कोण ?

भारतीय गोलंदाज दीपक चहरने गजनी लूक परिधान केला आहे. त्याने खास गजनी हेअरस्टाईल केली आहे. चहरने इन्स्टाग्रामवरून आपले नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले. टीम इंडियाचे क्रिकेटपटू आपल्या विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. नव्या जाहिराती, नवे लूक्स या गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक क्रिकेटपटू आपल्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. या क्रिकेटपटूने बॉलिवूड चित्रपट गजनी फेम आमिर खानची हेअरस्टाईल केली आहे