दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे टीईटी परीक्षेत यश

0

जळगांव: स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थीनींनी टीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शालेय शिक्षक होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा निकाल आज रोजी जाहीर झाला. यात शितल रूपसिंग बारेला व मानसी श्रीपाद उपासनी यांनी घवघवीत.

यश संपादन केले. यशाबद्दल प्रा. गोपाल दर्जी यांनी उत्तीर्ण विद्यार्थींनींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या परीक्षेत शितल बारेला हिला 97 तर मानसी उपासनीला 91 गुण मिळाले आहेत. शितल बारेला ही इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. तर मानसी उपासनी ह्या सध्या प. न. लुंकड कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या सेवेत कायम होण्यासाठी त्यांना सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी दर्जी फाऊंडेशनमध्ये मार्गदर्शन घेतले . येथे मिळालेल्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे त्यांना लाभ झाला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दर्जी फाऊंडेशन हे यशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे येथील मार्गदर्शनाचा मला फारच लाभ झाला असे मत यशस्वी मानसी उपासनी यांनी व्यक्त केले. त्यांच्या सत्कार प्रसंगी त्यांचे पती ऍड. उपासनी हे देखील उपस्थित होते. यशस्वी शितल बारेला व मानसी उपासनी यांचे गोपाल दर्जी यांच्यासह  ज्योती दर्जी, श्रीराम पाटील,प्रवीण पाटील व दर्जी फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.