Private Advt

टीईटी परिक्षा घोटाळ्यातील कोटीची माया जिरली शिंदगव्हाण,काकर्दे जमिनीत ? 

नंदुरबार : टीईटी परीक्षा घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तथा परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या हस्तकांचे धागेदोरे नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण पर्यंत पोहचले आहेत. त्यांच्या हस्तकांनी या भागात कोट्यवधी रुपयांची जमिनीत गुंतवणूक केल्याची बाब समोर येत असून याची चौकशी झाल्यास बरीचशी माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

शासकीय कर्मचारी असलेल्या दोघांनी गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत शिंदगव्हाण सह काकरदे परिसरात सुमारे 30 एकर हुन अधिक जमीन खरेदी केल्या आहेत. गेल्यावर्षीच सुमारे 4 कोटी रुपयांची जमीन मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी 50 लाखाहून अधिक रक्कमेचे यंत्र खरेदी केले आहे. परिसरातील अनेक जमिनी अटी खरेदीने घेऊन शेतकऱ्यांना भुमिहीन करण्याचा प्रयत्न केला आहे, एकंदरीतच या संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी आयुक्त तुकाराम सुपे यांच्या हस्तकांचा काही सहभाग आहे का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. पुणे पोलिसांनी याची सखोल चौकशी केल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . टीईटी पेपर गैरव्यवहारात जी ए सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर अटक करण्यात आलेल्या दोघा मुख्य एजंटांना ३५० परीक्षार्थींचे ३ कोटी ८५ लाख रुपये देणाऱ्या दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकहून अटक केली होती . तसाच तर हा काहीसा प्रकार असल्याची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.