टायर्स चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी: 51 हजाराचे बक्षीस

0

जळगाव- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे महामार्गावर असलेल्या जे.के. टायर्स च्या गोडावूनमधन अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी 23 लाख रुपयांचे टायर्स चोरनु नेल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री मध्यरात्री 1 ते 3 वाजेदरम्यान घडली होती. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. यातील एका संशयिताचे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रेखाचित्र जारी केल असून माहती देणार्‍यास 51 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे महामार्गा क्रमांक सहा वर जे.के. टायर्सचे गोडावून आहे. या गोडावून संशयितांनी 23 लाखांचे टायर्स चोरुन नेले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून पोलिसांनी फुटेज हस्तगत केले आहे. यात एक संशयित दिसून येत आहे. ते सीसीटीव्ही फुटेजचे छायाचित्र तसेच याच छायाचित्रावरुन स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. दोन्हींमधील व्यक्ती हा एकच आहे. हा संशयिताबाबत माहिती देणार्‍यास 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. कुणालाही संबंधित संशयिताबाबत माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे शाखा 0257 2221790 , धरणगाव पोलीस स्टेशन 0288 259333 तसेच 9823019711, 9422748590 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

Copy