Private Advt

टाकळी प्र.चा येथे विवाहितेला ऑनलाईन 50 हजारांचा गंडा

चाळीसगाव : टाकळी प्र.चा येथे विवाहितेला ऑनलाईन 50 हजारांचा गंडा एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन 50 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे उघडकीला आली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन घातला गंडा
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (43) या विवाहितेला शनिवार, 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 12.15 वाजताच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (7866992318) एटीएम पिन तयार करून देतो म्हणून संदेश आला. तेव्हा वंदना विजय पाटील यांच्याकडून बँक खात्याची सर्व माहिती घेतली. अ‍ॅनी डेस्क नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यातून 49 हजार 999 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. त्यावर वंदना विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी भादंवि कलम 420 व आयटी अ‍ॅक्ट 66 (सी) प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील करीत आहेत.