टाकळी प्र.चा.येथे तरूणाच्या डोक्यात रॉड मारल्याने गंभीर

0

मृत्यु झाल्याची अफवा

चाळीसगाव – गणपती मंडळाच्या स्टेज जवळ एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना २१ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील खरजई रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळील गणेश मंडळाच्या स्टेज जवळ घडली असुन जखमीवर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन मृत्यूशी झुंज देत आहे मात्र कालपासुन जखमीचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील टाकळी प्र चा येथील खरजई रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळील शिवराजे गणेश मित्र मंडळाच्या स्टेज जवळ जखमी अकील उर्फ बबलु सलीम खाटीक (वय- २३) रा.सावली बिल्डींग खरजई नाका चाळीसगाव व दिपक गावडे आणि आरोपी भावडु पाटील, विकी ढवळे, बळीराम महाजन, आण्णा चौधरी सर्व रा चाळीसगाव हे बसले असतांना आरोपींनी तु दिपक गावडे बरोबर का राहतो तुला फार मस्ती आली आहे असे म्हणुन वाद घातला व दोघांना लाथा बुक्यांनी मारहाण केली तर आरोपी विकी ढवळे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड मारुन जखमी केले यात अकील खाटीक गंभीर जखमी झाल्याने त्यास तात्काळ चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात आणल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास तात्काळ धुळे येथील ओम क्रिटीकल केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असुन तो शेवटच्या घटका मोजत आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फारुख शफी खाटीक याचे फिर्यादीवरुन वरील चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउनि सुधीर पाटील करीत आहेत.