टँकरने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू

0

नवापूर: शहराजवळील धुळे सुरत हायवे रोडवर गोडाऊन समोर सकाळच्या सुमारास गॅस टँकरने मोटार सायकलला टक्कर दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ९.३० सुमारास ही घटना घडली. मृतकाचे नाव स्वप्नील दिलीप माळी (वय 24 रा पांडेसरा सुरत) असे आहे. या घटनेत मोटारसायकल मागे बसलेला पंकज गंगाराम माळी (24) हा देखील गंभीर जखमी झाला आहे.

टँकरचा ताबा सुटल्याने अपघात
सविस्तर वृत्त असे की, एमएच 46 -एच ओ 0834 क्रमांकाच्या टँकरचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या जीजे एस 1603 या मोटारसायकलला जोरदार ठोस मारली. यात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला आहे. अपघात होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून येत असल्याचे पाहून टँकर चालक फरार झाला आहे. पंकज हा रस्त्यावरचा कडेला जखमी अवस्थेत पडला होता. त्यास जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. टँकरचालकच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांचा मामार्गदर्शनाखाली पो का योगेश थोरात पो काॅ दिलीप चौरे,करीत आहे. धुळे-सुरत हायवे वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अरुंद रस्ते, साईट पट्ट्या लेवल नाहीत. रस्त्याचा कडेला झुडपे वाढलेली असल्याने आणि रस्त्यावर खड्डे अधिक असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.