झोटींग समितीची 29 रोजी अंतिम सुनावणी

0

नागपुर। भोसरी येथील जमीन गैरव्यवहारची चौकशी करीत असलेल्या डी. झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे सर्व अर्ज फेटाळून लावत काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा मात्र खडसेंना दिली आहे. यावर 29 एप्रिल ला अंतिम सुनावणी होणार आहे. यामुळे या प्रकरणाचा निकाल लागण्याचे संकेत मिळाले आहेत.

अर्ज फेटाळला
महसूल मंत्री असताना एकनाथराव खडसेंनी भोसरी येथील एमआयडीसीची जागा पदाचा वापर करून आपल्या नातेवाईकांना कमी दरात दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायधीश डी. झोटींग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. समितीने या प्रकरणाशी संबंधीत विविध जणांची साक्ष नोंदविली. यात खडसेंनी पुणेच्या जिल्हाधिकार्‍यांना उलट तपासणीसाठी परत बोलाविण्यासोबत समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेतला. समितीने जिल्हाधिकार्‍यांना बोलाविण्यास नकार दिला. तर दुसरा अर्जावर अंतिम निर्णयावेळी निर्णय देणार असल्याचा आदेश दिला. या आदेशावर आक्षेत घेत तो मागे घेण्यासाठी खडसेंनी पुन्हा नव्याने अर्ज केला. यावर सुनावणी घेत हा आदेश मागे घेण्यास नकार देत खडसेंचा अर्ज फेटाळून लावला. मात्र यात काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा खडसेंना दिली आहे. 29 ला अंतिम सुनावणी होणार आहे. एमआयडीसीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चंद्रशेखर जलतारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.