Private Advt

झोक्यातून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

यावल : तालुक्यातील भालशिव गावात एक वर्षीय लहान चिमकुलीचा झोक्यातून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी घडली. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भालशीव, ता.यावल येथील शेत-शिवारातील रहिवासी गिरीष पारधी यांची एक वर्षाची राशी गिरीष पारधी ही मुलगी झोपडीमधील बांधलेल्या झोक्यात झोपली असताना अचाकन झोक्यातून पडली. तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तिला जळगाव येथे उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गुरूवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या संदर्भात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.