झेंडूजी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

0

भुसावळ : खान्देशातील वारकरी सांप्रदायाचे आद्यप्रणेते वै. हभप झेंडूजी महाराज यांची 216 वी पुण्यतिथीनिमित्त महालक्ष्मी गृपतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. राम मंदिर वॉर्डातील रहिवासी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी गृपचे सदस्य वसंत भोगे, चंद्रकांत पाटील, लिलाधर भारंबे, सुपडू भंगाळे, मेघःश्याम फालक, प्रकाश चौधरी, अरुण धांडे, रामभाऊ महाजन, नितीन धांडे, सचिन पाटील, कैलास कुरकुरे, नितीन नाले, लिलाधर जंगले, कमलेश चौधरी, मधुकर लोखंडे यांसह समाजबांधव उपस्थित होते.