झुकरबर्गने केला मोदींचा गौरव

0

न्यूयॉर्क । सरकार आणि नागरिकांत सोशल मीडियाच्या माध्यमातून किती उत्तमप्रकारे समनव्य साधला जाऊ शकतो, हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दांत फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने मोदी यांचा गौरव केला आहे. बील्डिंग सोशल कम्युनिटी नावाचा मोठा निबंधच झुकरबर्गने लिहिला आहे. त्यात त्याने मोदी यांचा गौरव केला आहे. सरकार आणि नागरिकांमध्ये उत्तम समनव्य घडवून आणण्याचे काम सोशल मीडिया प्रभावीपणे करू शकतो. मोदी यांनी ते करून दाखवले आहे. मोदी यांनी सर्व मंत्र्यांना फेसबूकचा वापर करण्यास सांगितले आहे. आपण करत असलेले काम या माध्यमातून नागरिकांपर्यंत नेण्याची त्यांची सूचना आहे आणि त्या माध्यमातून ते सरकार व नागरिकांत समनव्य घडवून आणत आहेत, असे झुकरबर्गने या निबंधात म्हटले आहे.

फेसबूक सुरू करताना प्रारंभी घर आणि मित्रमंडळींना जोडण्याची कल्पना होती. मात्र, आता समाजासाटी काही तरी भरीव व ठोस करण्याची इच्छा व गरज आहे. त्यासाठी सोशल मीडिया प्रभावी ठरू शकतो, असे निरीक्षणही त्याने नोंदवले आहे. याच निबंधात त्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिकीकरणाविरोदातील धोरणांवरही टीका केली आहे.