झिम्बाबेला नमवीत अफगाणिस्तानच्या संघाने जिंकली मालिका

0

हरारे – अफगाणिस्तानच्या संघाने झिम्बाबेला 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पराभूत करत सर्वांना आश्‍चर्यचा धक्का दिला आहे. पहिलीच मालिका जिंकणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाने एक अशा विश्‍वविक्रम नोंदविला आहे, जो की आजपर्यंत कोणत्याही दिग्गज संघांना करता आलेला नाही. अफगाणिस्तान एकदिवसीय सामन्यात विरोधी संघाला सर्वात कमी धावात ऑलआऊट करणारा संघ बनला आहे.

डकवर्थ-लुईस पद्धतीने 106 धावांनी विजय
अफगाणिस्तानने हा सामना डकवर्थ-लुईस पद्धतीने 106 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 बाद 253 धावा केल्या. प्रतित्युरात झिम्बाबेला 22 षटकांत 161 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, झिम्बाबेचा संघ 13.5 षटकात 54 धावांवर गुंडाळला. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 14 वर्षांपूर्वीची विक्रम मोडीत काढला आहे. हरारे येथे झालेल्या या निर्णायक सामन्यात झिम्बाबेकडून फक्त दोनच फलंदाज रेयान बर्ल (11) आणि ग्रीम क्रेमर (14) यांना दुहेरी आकडा पार करता आले. आमिर हमजा आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी तीन, तर राशिद खानने दोन गडी बाद केले.