झारखंडमध्ये भाजपचेच सरकार बनणार; रघुवर दास यांना अजुनही विश्वास

0

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र अजूनही निकाल भाजपच्याच बाजूने लागील असा विश्वास मुख्यमंत्री रघुवर दास यांना आहे. सुरुवातीचे कल म्हणजे अंतिम निकाल नाही असेही त्यांनी सांगितले.

झारखंडमधील जमशेदपुर (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, मुख्यमंत्री रघुवर दास व त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या सरयू राय यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर आहेत.