झारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले पवार…

0

मुंबई: झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निकालात झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला जोरदार झटका बसला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भाजपच्या १६ जागा कमी झाल्या. कॉंग्रेस आघाडीला ४५ तर भाजपला २१ जागांवर विजय मिळाले आहे. यावरून भाजपबद्दलची नाराजी जनतेने दाखवून दिली. दरम्यान झारखंडच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संधी मिळताच जनता झारखंड सारखा निकाल देते असे म्हणत पवार यांनी भाजपला टोला लगावला.

भाजपकडून देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एनआरसीबद्दल देशात जनतेत रोष आहे. मात्र भाजपकडून हुकुमशाही सुरु असल्याने ते हा कायदा रद्द करत नसल्याची टीका ही पवार यांनी केली.

Copy