झाडांची बेकायदा कत्तल : आरोपी सद्दाम शहास अटक

यावल : तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायत हद्दीतील लहान-मोठे मिळून 79 हजार 48 रुपये किंमतीच्या 66 झाडांची परवानगीविना कत्तल करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी यावल पोलिसात सरपंच अलकाबाई मधुकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार सद्दाम शहा खलील शहा याच्याविरुद्ध 13 एप्रिल 2020 रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र संशयीत पसार होता. बुधवार, 2 जून रोजी रात्री आरोपीस यावल पोलिसांनी किनागावातून अटक केली.

यांनी केली आरोपीस अटक
यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हवालदार असलम खान, कॉन्स्टेबल सुशील घुगे, कॉन्स्टेबल निलेश वाघ, रोहिल गणेश यांच्या पथकाने संशयीत आरोपी सद्दाम शहा खलील शहा यास किनगावातून अटक केली. दरम्यान, संशयीतास न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.