Private Advt

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा तात्पुरता स्थगित

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांची माहिती

नंदुरबार। कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, 23 जानेवारी रोजी आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे 23 जानेवारी रोजी शहरातील विविध समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी शिवसैनिकांकडून जय्यत तयारी केली होती. परंतु,जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करावे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत पुढील कालावधीत कार्यक्रम घेण्यात येईल, असेही जिल्हाप्रमुख मोरे यांनी सांगितले.