ज्येष्ठांना पेन्शनसह अत्यावश्यक सेवा पुरवा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र-राज्य सरकारला आदेश

0

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या काळात आबालवृद्ध सगळ्यांनाच विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दायक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, मास्क, सॅनिटायझर्ससह कोरोना काळातील सर्व आवश्यक सेवा पुरविण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचे काम सरकारचे असून ते केले पाहिजे असे आदेश कोर्टाने दिले आहे.

कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठांनी घरीच थांबावे अशा सूचना सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र आवश्यक सेवांसाठी बाहेर पडावेच लागते. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.