Private Advt

जोयदा येथील नवविवाहित नर्सची आत्महत्या

धुळे : नवविवाहित नर्सने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील दोंदवाडे जोयदा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनीषा तोताराम पावरा (26, रा.दोंडवाडे जोयदा) असे मयताचे नाव आहे.

महिनाभरापूर्वीच झाला विवाह
शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी येथील माहेर असलेल्या व नर्स मनीषा पावरा हिचे 22 मे 2022 रोजी दोंडवाडे जोयदा येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या तोताराम पावरा यांची लग्न झाले व काही दिवसांपूर्वीच मनीषा ही सासरी आली होती. गुरुवार, 16 जून 2022 रोजी दोंडवाडे जोयदा येथील राहत्या सायंकाळी मनीषाने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात मनीषा हिला दाखल केल्यानंतर डॉ.शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी वॉर्डबॉय गणेश बेंडवाल यांनी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार माळी करीत आहे.