जोगलखेडा शिवारातून 15 हजारांची केबल वायर चोरीस

Cable wire worth 15 thousand stolen from Jogalkheda Shiwar भुसावळ : जोगलखेडा शिवारातून पाच शेतकर्‍यांच्या शेतातून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची केबल वायर लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
जोगलखेडा शिवारातील शेत गट क्रमांक 96 मधील पांडुरंग बाबूराव पाटील, ज्ञानदेव वामन पाटील, अशोक तुळशिराम लोखंडे, रामदास गणू धनगर, रमेश सुपडू नगर (सर्व रा.जोगलखेडा) यांच्या शेतातील बोअरवेलच्या सबमर्सिबल पंपची केबल वायर चोरट्यांनी 3 रोजी सायंकाळी पाच ते 4 रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान लांबवली. या प्रकरणी गुरुवारी पंकज पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.