जैन संघातर्फे मुमुक्षु रुची नहार यांचा सत्कार

0

भुसावळ । डॉ. माताजी ज्ञानप्रभाजी म.सा., सुप्रिय दर्शनाजी म.सा. यांच्या सान्निध्यात सुराणा साधना भवनात अनुमोदना कार्यक्रम जैन स्थानकवासी संघातर्फे उत्साहात साजरा झाला. प्रसंगी मुमुक्षु रुची नहार यांचे ज्येष्ठ श्रावक प्रेमचंद कोटेचा, संघपती प्रेमचंद चोपडा यांनी अभिनंदन केले. यानंतर गुरुमाईंनी आशिर्वाद देवून रुची यांचा धार्मिक इतिहास सभेत विधीत केला. प्रसंगी डॉ. सपना सुराणा, रिंकू बाफना यांनी भजने गायन केेली.

भजन गायन
येथील सुशिल बहुमंडळाच्या सदस्या पारस नाहाटा, सपना नाहाटा, लता सिसोदिया, प्रतिभा सिसोदिया, मंगला कोटेचा, टिना चोरडिया, वर्षा कोटेचा आदींनी साडीचोळी देवून मुमुक्षू रुची नहार यांचा सत्कार केला. यावेळी महिलांतर्फे भजन गायन झाले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी अनिता सांखला, पारसचंद कोठारी, सतिश साखरे, अजय जैन, गौतम चोरडिया, प्रशांत कोटेचा, कांतिलाल चोरडिया, शांतीलाल कोटेचा, सुमित चोरडिया, अशोक दोसी, सुभाष चिप्पड, विशाल चोरडिया, जे.बी. कोटेचा, राकेश चोपडा, दिलीप कोटेचा, पवन चोरडिया उपस्थित होते.