जैन भागवती दीक्षा समारोहात हिमांशी कांकरिया घेणार दिक्षा

0

जळगाव । राजस्थानमधील नागौर येथे 6 फेबु्रवारी रोजी हिमांशी कांकरिया यांचा जैन भागवती दीक्षा समारोह होत आहे. अखिल भारतीय श्री जैन रत्न हितैषी श्रावक संघाने हा समारोह आयोजित केला असून जळगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे सहकार्य आहे. 5 फेबु्रवारी रोजी दीक्षा घेणार्‍या हिमांशी कांकरिया या राजस्थानमधील नागौर येथील आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून गेल्या एक वर्षापासून त्या धर्माचरण करीत आहेत. त्या हिंदी, इंग्रजी, गुजराथी, राजस्थानी भाषा बोलू व वाचू शकतात. या दीक्षा महोत्सवानिमित्त 5 फेबु्रवारी रोजी नयनतारा शोरुम, सुभाष चौक येथून सकाळी 8.30 वाजता शोभायात्रा निघेल. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कांकरिया परिवार व यापूर्वी दीक्षार्थी होऊन गेलेल्या वीर परिवारांचे अभिनंदन केले जाईल. दुसर्‍या दिवशी 6 फेबु्रवारी सकाळी 8 वाजता बीरदथाल, 9.15 वाजता प्रवचन, 10 वाजता अभिनिष्क्रमण यात्रा व 11.30 वाजता दीक्षा ग्रहण समारोह होईल.

परीवाराच्या परवानगीने गुरूंकडून मिळते दिक्षा
अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह या मूळ पाच महाव्रतांचे दीक्षार्थी संत किंवा साध्वी यांना आयुष्यभर पालन करावे लागते. व्याख्यात्री महासती इंदुबालाजी म.सा.व व्याख्यात्री महासती सुमतीप्रभाजी म.सा.आदि ठाणा 9 यांच्याद्वारे दीक्षार्थी बहिण दीक्षा ग्रहण करेल. याप्रसंगी तपस्वीराज श्रद्धेय श्री कानमुनिजी म.सा., संत मुनिराज आदि ठाणा व वर्धमान तप आराधिका महासती सुशिलाकुंवर म.सा. आदि ठाणा यांचे पावन सानिध्य लाभेल. रतनलाल सी.बाफना स्वाध्याय भवन, गणपती नगर, जळगाव येथे होणार्‍या या समारोहाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी संघाचे संघपती दलीचंद चोरडिया यांनी केले आहे.