‘जैन चषक’ स्पर्धेची तयारी पूर्ण

0

जळगाव। वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मुंबई यांच्या मान्यतेनुसार जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अ‍ॅकडमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच जैन इरिगेशन पुरस्कृत ‘जैन चषक’ आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसंबंधी सर्व तयारी पुर्ण झाली असून रविवारी 22 पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शनिवारी स्पर्धेसाठी संघ जिल्हात दाखल झाले. स्पर्धेसाठी 25 जिल्ह्यातील पाचशे महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

आमदार चंद्रकांत सोनवणे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, अपर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अशोक जैन, ललित कोल्हे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,ज्योती जैन, राजेश चौधरी, भालचंद्र पाटील, नंदलाल गादीया, दलीचंद ओसवाल, प्रकाश चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर स्पर्धेचे पारितोषीक वितरण 26 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यानींनी या स्पर्धेचे लाभ घ्यावा.