जेसीआयतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिबिर

0

जळगाव । जेसीआय जळगाव आणि अनायुष मधुमेह संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 7 एप्रिलरोजी जागतिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने निशुल्क रक्तशर्करा तपासणी शिबीर, उर्दू माधाय्मिक शाळा , धानोरा ता.चोपडा येथे आयोजित करण्यात आला. जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांनी यांचा लाभ घेतला. या शिबराला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

उद्घाटनप्रसंगी जेसीआय जळगावचे अध्यक्ष रफिक शेख,माजी अध्यक्ष सैयद अल्ताफ अली, अनायुष मधुमेह संशोधन केंद्राचे वैदकीय अधिकारी डॉ.सतीश पाटील, जेसीआयचे वीपीसीओ डॉ संगीता महाजन ,प्रोजेक्ट डिरेक्टर झरीयान सैय्यद,वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील आदी उपस्थीत होते. माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, वीपीएमओ वरुण जैन ,आनंद नागला ,दीपक पाटील,अजय चौधरी आदीचे सहकार्य लाभले.