जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच जीवनात यश मिळणे शक्य

0

भुसावळ । विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमात तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आई, वडिलांची तसेच ज्येष्ठांचा मान राखून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे आवश्यक आहे. यातूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असून ज्येेष्ठांच्या मार्गदर्शनानेच विकास होत असल्याचे प्रतिपादन हायटेक ब्रेन अ‍ॅकेडमीचे वसीम सैय्यद यांनी केले. येथील रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात शैक्षणिक चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांनी मार्गदर्शन केले.

या चर्चासत्रात जळगाव, जामनेर, भुसावळ, यावल, सावदा, फैजपूर, रावेर, मुक्ताईनगर येथून विद्यार्थी सहभागी झाले होते. यात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले.

गुणवत्ता वाढ आणि विकासासंदर्भात मार्गदर्शन
अ‍ॅकेडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासंदर्भात समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार्‍या अडचणी, एकाग्रता, आत्मविश्‍वास, आत्मपरिक्षण, चारित्र्य संपन्नता, गुणवत्ता वाढ आणि विकास आदी घटकांसंदर्भात वसिम सैय्यद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सचिन ढोले, अंजली देशपांडे, अभिषेक जैन, मो. हनिफ खान, करीम सालार, हाजी गफ्फार मलीक, अनिल बोरा, रमेश मकासरे, डॉ. अबरार खान, हाजी अन्सार, मुन्ना तेली, शेख अजिज गफ्फूर, सईद अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नसिम आबिद, इम्तियाज अहमद, मोहम्मद जावेद, फिरोज रहमान, नाजिम अहमद यांनी परिश्रम घेतले.