जेवणाचे पार्सल उशिरा आणल्यावरून वाद ; हॉटेल मॅनेजरने ग्राहकाला मारली बिअरची बाटली

0

वरणगाव- जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला वेळेत ऑर्डर न मिळाल्याने झालेल्या वादानंतर हॉटेल मॅनेजरनेच ग्राहकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी हॉटेल हतनूर पॅलेसच्या मॅनेजरविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव फॅक्टरी ते सावदा रोडवरील हतनूर पॅलेस हॉटेलवर रविवारी हतनूर गावातील युवक लखन सुपडू पाटील (21) शेवभाजीचे पार्सल घेण्यासाठी गेला होता. मॅनेजर अभिनंदन (ऊर्फ) बिट्टू प्रकाशचंद सोडी (51) याने पार्सल न दिल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. संशयित बिट्टू सोडीने यांनी वादात बिअरची बाटली पत्री शेडच्या खांबावर फोडून लखनच्या डोक्यावर मारली. तसेच संशयिताने लखनला शिविगाळदेखील केली. या घटनेत लखनच्या डोक्यावर गंभीर जखम झाली, त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सोडीविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.