जेएसपीएल फाऊंडेशनच्या मानकर्‍यांच्या निवडीस प्रारंभ

0

मुंबर्ई । पोलादनिर्माते जिंदल स्टील अँड पॉवर लि. (जेएसपीएल)चे सामाजिक दायीत्व उपक्रम (सीएसआर) पाहणारा घटक असलेल्या जेएसपीएल फाऊंडेशनने आपल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या दुसर्‍या पर्वासाठी देशभरातून 359 प्रवेशिका मिळविल्या आहेत. पुरस्कारार्थींच्या मूल्यांकन प्रक्रियेत हैदराबाद, चंदिगढ, मुंबई आणि कोलकाता अशा अनुक्रमे दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि पूर्व क्षेत्राच्या प्रादेशिक फेर्‍या घेतल्या जाणार आहेत. पश्चिम भारतातून निवड मंडळाने प्रारंभिक छाननी करून एकूण 67 प्रवेशिका निर्धारीत केल्या, त्यात 27 व्यक्तिगत तर 40 संस्थांकडून प्राप्त प्रवेशिका आहेत.

राष्ट्रीय स्वयंसिद्ध दुसर्‍या पर्वाची जोरदार तयारी
जेएसपीएल फाऊंडेशनचा दृष्टिकोन हा नवीन जिंदल (अध्यक्ष, जेएसपीएल) यांच्या प्रेरणेतून निश्चित केला गेला आहे, त्यांच्या मते – आमच्या यशाचे परिमाण हे जनसमुदायावर आपण सोडलेल्या विधायक प्रभावातून ठरते, अशी सुरुवातीपासून आमची धारणा आहे. जनसमुदायप्रति आमच्या निरंतर उपक्रम आणि हस्तक्षेपांमधून भारतभरातील लाखोंच्या जीवनावर सुपरिणाम साधला गेल्याचे आम्हाला दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसिद्ध सन्मानाच्या दुसर्‍या पर्वाची प्रक्रिया सध्या सुरू असून, मी सर्व सहभागींना सुयश चिंतितो. जेएसपीएल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे संकल्पना शालू जिंदल यांची असून, त्यांच्या देखरेखीतच जेएसपीएलच्या छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमधील सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांचे दिशादर्शन होते.