Private Advt

जुन्या वादातून रामेश्वर कॉलनीतील तरुणाला मारहाण

जळगाव :  जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर कॉलनीतील तरुणाला काठीसह लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी केंद्राजवळ पवन यशवंत पाटील (37) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 5 मे रोजी रात्री 1 वाजता पवन हा घरी असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून बाळा सोनवणे आणि भूषण शिंदे व अनोळखी दोन जणांनी पवन याला शिवीगाळ करून काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पवन याला गंभीर दुखापत झाली. याबाबत पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी बाळा सोनवणे आणि भूषण शिंदे आणि सोबत अनोळखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय धनगर करीत आहे.