Private Advt

जुन्या भांडणातून पिता-पूत्रास मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको येथे जुन्या भांडणातून तरूणासह त्यांच्या मुलाला दोन जणांनी दगडासह फरशीने मारहाण केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

जुन्या भांडणातून मारहाण
तालुक्यातील आसोदा येथील मूळ रहिवासी अंकुश धनराज साळवे (40) हे सद्यस्थितीत सुरत येथील उधना येथे वास्तव्यास आहेत. रविवारी ते त्यांचा मुलगा विक्कीसह यांच्यासह पिंप्राळा हुडको येथील सिध्दार्थ नगरात आले होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन राजेंद्र दिलीप शिरसाठ (रा.मुसळी, ता. धरणगाव) व राहुल युवराज सोनवणे (सिध्दार्थ नगर, जळगाव) या दोघांनी अंकुश साळवे यांच्यासह मुलगा विक्की यास शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व फरशी व दगडाने अंकुश साळवे यांच्यासह मुलगा विक्कीच्या डोक्यात मारहाण करुन दुखापत करण्यात आली. यात दोन्हीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी अंकुश साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजेंद्र दिलीप शिरसाठ व राहूल युवराज सोनवणे या दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलो. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.