जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना मारहाण

0

वाकड : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तिघांना मारहाण केली. ही घटना वाकड येथे घडली. शांताबाई भारत जाधव (वय 45, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कल्याणी मोदले, संजय मोदले, अंकुश कोचे, प्रदिप पाटोळे व इतर तीन इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा किरण जाधव याची आरोपी कल्याणी मुदले सोबत शनिवारी (दि. 24) किरकोळ वाद झाला होता. रविवारी किरण जाधव, शांताबाई यांची नात पूर्वा गुंजाळ आणि त्यांच्या ओळखीचा इसम दिलीप खुळे हे तिघेजण शांताबाई यांच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. शनिवारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अंगणात बसलेल्या तिघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्या ने मारहाण केली. तसेच जाधव यांच्या शेजार्‍यांनाही शिवीगाळ केली. यावरून शांताबाई यांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला.

Copy