जुन्या जळगावातून मोटारसायकल लांबवली

जळगाव- जुन्या जळगावातील विठ्ठलपेठमधील एका घरासमोरील 32 हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठलपेठमधील चंद्रकांत लिलाधर झोपे (वय 29) हे खासगी नोकरीला आहेत. त्यांनी 25 रोजी रात्री घरासमोर मोटारसायकल लावली. परंतु, ही मोटारसायकल सकाळी घरासमोर दिसली नाही. या मोटारसायकलला चोरट्यांनी रात्री 12.30 ते सकाळी 6 वाजेदरम्यान लांबवली. याबाबत चंद्रकांत झोपे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास नाईक अमित बाविस्कर करीत आहेत.